रागात मनगट कापून घ्यायची 'ही' अभिनेत्री, उद्धवस्त झालं करिअर; 'तब्बू'च्या मोठ्या बहिणीचे किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 09:44 AM2023-04-13T09:44:41+5:302023-04-13T09:53:33+5:30

तब्बूची मोठी बहीण असलेली 'ही' अभिनेत्री आठवते, आता कशी दिसते?

बॉलिवूड कलाकारांचे एकापेक्षा एक किस्से असतात. कोणाचे वैयक्तिक आयुष्यातील किस्से तर कोणाचे प्रोफेशनल. त्यात अभिनेत्री म्हणलं की त्यांचे नखरे हे असतातच. अशीच एक अभिनेत्री फराह नाझ (Farah Naaz). तिचे किस्से खूपच विचित्र आहेत.

फराह नाझ अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण आहे. फराह नाझनेही चित्रपटसृष्टीत बराच काळ अभिनेत्री म्हणून काम केले. मात्र तिला कधीच स्वत:ची वेगळी जागा बनवता आली नाही. त्याला कारण ठरलं ते तिच्या वाईट सवयी आणि राग.

80 च्या दशकात अभिनय केलेल्या अभिनेत्री फराह नाझला यश चोप्रा यांनी पहिला ब्रेक दिला होता. तिचे सौंदर्य आणि अभिनय यामुळे तिला चित्रपटाच्या बऱ्याच ऑफर आल्या.मात्र 'अनप्रोफेशनल' वर्तवणूक तिला महागात पडली. फराह नाझ असं काय वागायची की तिच्या हातातून प्रोजेक्ट्स गेले?

तर फराहला प्रचंड राग यायचा. अनेकदा सिनेमाचं चित्रीकरण करताना सेटवरही तिचा राग अनावर व्हायचा. तिने सहकलाकार, दिग्दर्शक यांना शिविगाळ केल्याचंही बोललं जातं. तसंच तिला एक विचित्र सवय होती. रागाच्या भरात ती स्वत:चं मनगटच कापून घ्यायची. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

फराह नाझने स्वत:च एका मुलाखतीत हे मान्य केलं आहे की तिला रागाच्या भरात स्वत:लाच इजा करुन घेण्याची सवय आहे. तिने सांगितले,'मी स्वत:ला मारण्यासाठी असं वागत नाही. मनगट कापून कोणी मरत नाही. माझं कुटुंब मला असं करु देणार नाही.'

ती म्हणाली,'जेव्हा मला माझ्या जवळची माणसं आई, बहीण किंवा माझा बॉयफ्रेंड काही बोलतात तेव्हा मला ते असह्य होतं आणि मी मनगट कापते. असं मी दोन तीन वेळा नाही तर बऱ्याचदा केलं आहे. जेव्हा मी असं करते तेव्हा मला वेदनाही होत नाहीत. माझ्या जखमा बघून त्यांना कळेल की त्यांनी मला दुखावलं आहे. मी स्वत:ला मारलं तर त्यांना कळणार नाही.'

फराह नाझच्या अशा वागण्यानेच तिचं करिअर उद्धस्त झालं. वैवाहिक आयुष्यातही उलथापालथ झाली. फराहने बिंदू दारा सिंगसह 1996 मध्ये लग्न केलं होतं. मात्र 2002 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांना फतेह रंधावा मुलगा आहे.

यानंतर तिने 2003 मध्ये अभिनेता सुमीत सेहगलसह लग्नगाठ बांधली. यानंतर ती संसारातच रमली आणि मोठ्या पडद्यावरुन गायब झाली.