TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ची माधवी जगते लक्झरी लाईफ, जाणून घ्या कोण आहे तिचा रिअल लाईफ पती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 12:16 PM2022-12-05T12:16:51+5:302022-12-05T12:32:15+5:30

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सोनालिका जोशी आत्मारात भिडे यांची पत्नी बनून सर्वांचं मनोरंजन करते. पण खऱ्या आयुष्यातील तिच्या पतीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, मिस्टर हाथी, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे.

या मालिकेनं केवळ लोकांचं मनोरंजन केलं नाही तर अनेक कलाकारांना वेगळी ओळखही दिली. माधवी भाभी त्यापैकीच एक. आम्ही बोलतोय ते माधवी भाभीची भूमिका साकारणाऱ्या सोनालिका जोशी हिच्याबद्दल.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत सोनालिका जोशी आत्मारात भिडे यांची पत्नी बनून सर्वांचं मनोरंजन करते. पण खऱ्या आयुष्यातील तिच्या पतीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या माधवी भाभीने अर्थात सोनालिकाने रिअल लाईफमध्ये समीर जोशी यांच्याशी लग्न केलंय.

2001 मध्ये सोनालिका व समीर यांचं लग्न झालं. दोघांना आर्या नावाची एक मुलगी आहे. अनेकदा सोनालिका आपल्या कुटुंबाचे फोटो शेअर करते.

सोनालिका लक्झरी आयुष्य जगते. तिला महागड्या गाड्यांची आवड आहे. MG Hector, Swanky Maruti, टोयोटा इटियॉस अशा महागड्या गाड्या तिच्याकडे आहेत.

माधवी भाभीच्या लुकमध्ये तुम्ही तिला पाहिलंच. पण खऱ्या आयुष्यात सोनालिका कमालीची ग्लॅमरस आहे. तिचे सोशल मीडियावरचे फोटो पाहिल्यावर तुम्हालाही याची खात्री होईल.

अ‍ॅक्टिंगसोबतच सोनालिका एक बिझनेसवुमन आहे. सोनालिका व समीर दोघंही एका अलिशान घरात राहतात.

सोनालिकाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेआधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता याच मालिकेमुळे मिळाली. प्रेक्षक आता तिला माधवी याच नावाने ओळखायला लागले आहेत.