"तारे जमीन पर मूर्ख चित्रपट, बापाला हवं तेच मुलाने करायचं," युवराज सिंगच्या वडिलांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 09:56 IST2025-01-14T09:47:08+5:302025-01-14T09:56:23+5:30
Yograj Singh : टीम इंडियासाठी १ कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळलेले योगराज सिंह त्याच्या चिवट स्वभावासाठीही ओळखले जातात.

भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी बॉलीवूडबद्दल आपले स्पष्ट मत व्यक्त केले. आमिर खान आणि दर्शील सफारी यांच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाबाबत धक्कादायक वक्तव्य केले आहे. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला आणि ब्लॉकबस्टर ठरला होता.
मात्र, या चित्रपटाबाबत क्रिकेटर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचे मत वेगळे होते. त्यांनी याला मूर्खपणा म्हणत आणि मी असे चित्रपट पाहत नाही असे सांगितले.
योगराज सिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर खान आणि दर्शील सफारी यांच्या २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा तीव्र निषेध केला आहे.
योगराज सिंग यांनी युट्यूबर समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत पालकत्वाबद्दल भाष्य केलं. "बापाची इच्छा असेल तेच मुलाने केले पाहिजे" असं योगराज सिंग म्हणाले.
यावर समदीशने योगराज यांना तुम्ही आमिर खानचा 'तारे जमीन पर' पाहिला आहे का? असं विचारलं. त्यावर योगराज म्हणाले की, “मी पाहिला आहे. हा अतिशय मूर्ख चित्रपट आहे. मी असे चित्रपट पाहत नाही."
मुलाला आपल्या वडिलांना जे बनवायचे आहे तेच होणार असा योगराज सिंग विश्वास आहे आणि कदाचित हेच त्यांच्या विधानामागील कारण असावे.
१२ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर ९८.४८ कोटी रुपयांचे कमाई केली होती. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा पाचवा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात मुलांचे शिक्षण आणि त्यांची मानसिक स्थिती यावर लक्ष केंद्रित केले होते, ज्याचे लोकांनी खूप कौतुक केले.