हळद ही ओली लावा नवरीच्या गाली! 'आई कुठे..' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:04 IST2024-12-25T12:45:32+5:302024-12-25T13:04:00+5:30

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (kaumudi walokar)

या फोटोमध्ये मराठी मालिकाविश्वातील कलाकार दिसतील. हे कलाकार अभिनेत्री कौमुदी वलोकरच्या हळदीला एकत्र आले आहेत

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरने तिच्या हळदीचे सुंदर फोटो शेअर केलेत.

कौमुदीला तिचे मित्र-मैत्रीण आणि कुटुंबियांनी हळद लावली असून कौमुदी फार सुंदर दिसत आहे.

पिंक रंगाचा सुंदर वन पीस कौमुदीने हळदीसाठी परिधान केला होता. कौमुदीच्या हळदीसाठी फुलांची सुंदर सजावट केलेली दिसून आली

कौमुदीची लगीनघाई सुरु आहे. कौमुदीला आज हळद लागल्याने ती पुढील काहीच दिवसांत लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे

कौमुदीच्या हळदीचे फोटो समोर येताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंना पसंती दिलीय

कालच कौमुदी वलोकरने मेहंदीचे सुंदर फोटो शेअर केले होते. कौमुदीच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे