हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 16:13 IST2024-12-22T16:09:42+5:302024-12-22T16:13:03+5:30

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची लगीनघाई! समोर आले ग्रहमखाचे फोटो

सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरदेखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कौमुदीचं केळवण पार पडलं. 'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी तिच्या केळवणाचा घाट घातला होता.

आता मालिका संपल्यानंतर तिच्या घरी लगीनघाई सुरू आहे. कौमुदीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

नुकतंच कौमुदीचं ग्रहमख पार पडलं. याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.

यामध्ये कौमुदीने साडी नेसुन हातात हिरवा चुडा भरला आहे. डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचंही दिसत आहे.

कौमुदीने गेल्या वर्षाच्या अखेरीस साखरपुडा केला होता. आता ती लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. कौमुदी आकाशसोबत सात फेरे घेत संसार थाटणार आहे.

दरम्यान, कौमुदीने अनेक मालिका, नाटक यांमध्ये काम केलं आहे. 'आई कुठे काय करते'मध्ये तिने आरोहीची भूमिका साकारली होती.