Fire हो तुम! 'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 02:34 PM2024-06-09T14:34:34+5:302024-06-09T14:57:54+5:30

'आई कुठे...'मधील अरुंधतीचं हटके फोटोशूट, मधुराणीचे फोटो पाहून वेडे व्हाल

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका. या मालिकेतील देशमुख कुटुंब आणि खास करून अरुंधतीला प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे.

या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. 'आई कुठे काय करते' मालिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली.

मधुराणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मधुराणीने जांभळ्या रंगाची साडी आणि लांब बाह्यांच्या प्रिंटेड ब्लाऊजमध्ये फोटोशूट केलं आहे.

कानात झुमके आणि केसांत गुलाब माळत तिने साधा लूक केला आहे. साध्या लूकमध्येही तिचं सौंदर्य खुलून आल्याचं दिसत आहे.

फोटोसाठी मधुराणीने खास पोझही दिल्या आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

मधुराणीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.

मधुराणीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. "फायर हो तूम" अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.