Aashka Goradia corona positive with her husband brent goble share post on instagram see pics
अभिनेत्री आशका गोराडियाला झाली कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 10:40 AM2021-04-30T10:40:06+5:302021-04-30T10:40:06+5:30Join usJoin usNext टेलिव्हिजन इंडस्ट्रीला अलविदा केलेली अभिनेत्री आशका गोराडियाला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. आशका गोराडियाने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. आशकाने सांगितले की, नुकतीच ती नवरा ब्रेंट गोबलच्या कुटुंबाला भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार होती. यापूर्वी तिने आपली कोरोना टेस्ट केली ज्यात त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र पुन्हा टेस्ट केल्यानंतर दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आशकाने सांगितले की, आम्ही शारिरीक रित्या खूप चांगले वाटत आहे, मात्र टेस्टचा रिपोर्ट पाहून सध्या आम्हाला व्हायरसला दूर पळवायचे आहे. यासोबत आशकाने आपल्या चाहत्यांना प्रार्थना केली त्यासाठी आभार मानले आहेत. सोशल मीडियावर आशका गोराडिया खूप सक्रीय आहे आणि हॉट योगा फोटोशूटमुळे चर्चेत राहते.टॅग्स :आशका गोराडियाAashka Goradia