अभिनेत्री रुची सवर्णचं मॅटर्निटी फोटोशूट, फोटो एकदा पाहा तर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 17:29 IST2021-11-18T17:19:55+5:302021-11-18T17:29:29+5:30
अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण यांच्याकडे गुडन्यूज आहे. होय, लवकरच दोघं आई बाबा होणार आहेत.

अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण यांच्याकडे गुडन्यूज आहे. होय, लवकरच दोघं आई बाबा होणार आहेत.
तूर्तास काय तर रुचीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा आहे. होय, रुची आणि अंकित दोघांनीही त्यांच्या सोशल अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अंकित व रुची दोघांच्याही चेह-यावरचा आईबाबा बनण्याचा आनंद ओसंडून वाहतोय.
फोटोत रुची बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. अंकितसोबत तिने मस्त पोझ दिल्या आहेत.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेत रुचीने साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती.
अंकित आणि रुचीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलंय. फत्तेशिकस्त या सिनेमातही दोघं महत्वाच्या भूमिकेत झळकले होते.
एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमापासून अंकित मोहनने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
मिले जब हम तुम, घर आजा परदेसी, महाभारत, कुमकुम भाग्य यांसारख्या मालिकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या.
मन फकिरा या सिनेमातही तो झळकला होता. लवकरच अंकित ‘पावनखिंड’ सिनेमात झळकणार आहे.