actor mohit raina remembers his childhood days in kashmir terror environment
काश्मीरमधील दहशतीत गेलंय मोहित रैनाचं बालपण, म्हणाला, "माझ्यासमोर गोळीबार..." By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 02:57 PM2023-09-11T14:57:37+5:302023-09-11T15:09:40+5:30Join usJoin usNext शाळेला जळताना पाहिलं... मोहित रैना (Mohit Raina) टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'देवो के देव महादेव' आणि 'महाभारत' या मालिकांमधून त्याने खरी ओळख मिळवली. 2019 साली आलेल्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' सिनेमात त्याने 'मेजर करण कश्यप'ची भूमिका साकारली. मोहित आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. नुकतंच त्याने एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बालपणीच्या आठवणीच्या ताज्या केल्या. मोहितचं बालपण काश्मीरमध्ये गेलं असून तिथे झालेल्या दहशतीचा मोहित स्वत: साक्षीदार आहे. मोहित वयाच्या ८ ते ९ वर्षापर्यंत काश्मीरमध्येच वाढला आहे. होमटाऊन काश्मीरची आठवण येते का असा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला, 'त्या आठवणी आम्ही कोणीच विसरु शकत नाही. जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये राहत होतो तेव्हा आम्हाला सतत मृत्यूची भीती वाटायची. पण मला ती जागा लक्षात येत नाही.मी ८-९ वर्षांचा असताना काश्मीरमध्ये राहायचो. माझं बालपण तिथेच गेलं. तेव्हा काश्मीर दहशतीत होतं. तो सर्वात कठीण काळ होता. आम्ही स्वत: तो काळ बघितला आहे. मला सगळं आठवतंय. मी माझ्या शाळेला जळताना बघितलंय. हे फारच वैयक्तिक आहे. कोणीच या गोष्टी समजू शकणार नाहीत.सकाळी शाळेत जाताना फायरिंग होताना बघून घरी सुखरुप जाऊ शकू की नाही हीच शंका असायची. मी ८ वर्षांचा असताना आम्ही कुटुंबीय बाहेर गेलो होतो. आम्ही अक्षरश: समोर मृत्यू पाहिला. मी आणि माझे आईबाबा रस्त्याच्या एका कडेला होतो तर दुसऱ्या बाजूला माझे भाऊ बहीण उभे होते आणि रस्त्याच्या मधोमध गोळीबार झाला. तेव्हा तुम्हाला कळतं की आपण आयुष्यात बरंच काही बघितलं. काश्मीर फाईल्स बघायची आमची कोणाची हिंमतच झाली नाही आणि कधी होणारही नाही. मी लहानपणीपासूनच सैनिकांना जवळून बघितलं आहे. जवान नेहमीच आसपास असायचे. म्हणूनच मी वर्दी आणि सैनिकांबद्दल नेहमीच विचार करतो. मला युनिफॉर्मबद्दल खूप आदर आहे. म्हणूनच मी जवानच्या भूमिका करायला मिळाल्या तर ती संधी सोडत नाही. मग ती भूमिका छोटी असो किंवा मोठी. मोहित रैना 'द फ्रीलान्सर' सीरिजमध्ये दिसत आहे. यामध्ये त्याने पोलिस अविनाश कामत या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. टॅग्स :टिव्ही कलाकारवेबसीरिजTV CelebritiesWebseries