‘असं’ आहे ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री अनघा अतुलचं हॉटेल; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 08:19 PM2023-10-20T20:19:56+5:302023-10-20T20:26:35+5:30

अनघानं हॉटेलची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

'रंग माझा वेगळा' या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा अतुल हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. आता अनघाने हॉटेल क्षेत्रात उडी घेतली आहे.

तिने पुण्यातील डेक्कन भागात अनघाने 'वदनी कवळ' हॉटेल सुरू केलं आहे. १९ ऑक्टोबर रोजी या हॉटेलची सुरुवात झाली.

अनघा ही भगरे गुरुजी यांची कन्या आहे. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती की, भाऊ अखिलेश भगरे याच्यासह ती पुण्यामध्ये एक हॉटेल सुरू करते आहे.

तिच्या हॉटेलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अनघाचं हे हॉटेल शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी आहे. या हॉटेसमध्ये शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण, परिपूर्ण थाळीचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे

अनघाच्या हॉटेलची नेमप्लेटमध्ये केळीच्या पानावर मोदक, वरण-भात, कुरडई, अळूवडी, बटाट्याची भाजी, कोशिंबीर, पुऱ्या, दही अशी पदार्थ दिसतात. तिनं ही नेमप्लेट खास डिझाईन करून घेतली आहे.

अनघा अतुलच्या हॉटेलला मराठी सिनेसृष्टीतील तिच्या मित्रपरिवारांनी भेट दिली. अनघाला शुभेच्छा देण्यासाठी 'रंग माझा वेगळा' मालिकेतील तिचे सहकालकर उद्घाटनाला उपस्थित होते.

ऋतुजा बागवे आणि अनघा अतुल खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. 'वदनी कवळ'मध्ये अनघानं स्वतःच्या हाताने ऋतुजाला जेवण वाढलं.

अनघाचा जन्म 24 जून 1994 रोजी नाशिकमध्ये झाला. तिला लहानपणापासून अभिनयाची तसेच मॉडलिंगची आवड होती. तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे.

अनघा भगरेचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. या नवीन सुरुवातीला चाहत्यांनी तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत.