छोट्या पडद्यावरुन गायब, ओटीटी माध्यमात आजमावतेय नशीब; तरी जगतेय आलिशान आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 14:13 IST2024-08-01T14:00:08+5:302024-08-01T14:13:17+5:30
अभिनेत्रीच्या कमाईचा सोर्स काय?

करिश्मा तन्ना (Karishma Tanna) टेलिव्हिजनवर लोकप्रिय अभिनेत्री आहे. लूक्स आणि अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत नाव कमावलं. काही महिन्यांपूर्वी आलेली तिची 'स्कूप' सीरिजही खूप गाजली.
करिश्मा तन्नाने अनेक महिन्यांपासून टेलिव्हिजनपासून दूर आहे. तरी ती अतिशय लक्झरियस आयुष्य जगते. करिश्माचा इनकम सोर्स नक्की काय आहे?
करिश्मा सध्या टीव्हीवर दिसत नसली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिने आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं. 'क्यूँकी साँस भी कभी बहू थी', 'पालखी' या मालिकांमुळे ती लोकप्रिय झाली.
मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा तन्नाचं एकूण नेटवर्थ 41 कोटी रुपये आहे. दर महिन्याला ती 30 लाख रुपयांची कमाई करते. तिच्या लक्झरियस लाईफस्टाईलवरुन हे लक्षात येतं.
करिश्मा तन्नाने टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर झाल्यानंतर ब्रँड्स आणि पेड प्रमोशनमधून बरीच कमाई करते. एका पोस्टचे तिला 70 ते 80 लाख मिळतात.
करिश्मा मुंबईतील पॉश एरियात 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहते. इथे ती आपल्या कुटुंबासोबत राहते. तिने स्वत: घर डिझाईन केलं आहे. याशिवाय तिच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.
करिश्माने 2022 साली वरुण बंगेरासोबत लग्नबंधनात अडकली. वरुण रिअल इस्टेट बिझनेसमन आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
करिश्मा सध्या सिनेमा आणि ओटीटीवरच आपलं नशीब आजमावत आहे. तिच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.