Adah Sharma : "हे माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं..."; अभिनेत्री अदा शर्मा कधीच करणार नाही लग्न?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:43 IST2025-03-12T15:27:05+5:302025-03-12T15:43:13+5:30
Adah Sharma : अदाला लग्न करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला.

अभिनेत्री अदा शर्माचा 'केरळ स्टोरी' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती.
सुशांत सिंह राजपूतचं घर खरेदी केल्यामुळे अदा काही महिन्यांपूर्वी जोरदार चर्चेत आली होती.
आता ती तिच्या एका विधानामुळे चर्चेत आहे. अदाला लग्न करण्याबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने सांगितलं की, तिला लग्न करायचं नाही.
"माझं स्वप्न आहे की, मी लग्न करू नये. लग्नाचं स्वप्न पाहणं हे माझ्यासाठी एका वाईट स्वप्नासारखं असेल."
"मला कोणत्याही नात्याची किंवा नात्यात अडकायची भीती वाटत नाही."
"मी पडद्यावर नवरीची भूमिका अनेक वेळा साकारली आहे. खऱ्या आयुष्यात लग्न करण्याची इच्छाच आता नाहीशी झाली आहे."
"भविष्यात जर मला लग्न करायचं असेल तर मी आरामदायी कपड्यांमध्ये लग्न करेन. त्या जड लेहेंग्यात नाही" असं अदाने म्हटलं आहे.
अदा शर्माने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तिचे असंख्य चाहते आहेत.