'इश्कबाज' फेम अभिनेत्रीला झाली कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 18:28 IST2020-07-01T18:28:57+5:302020-07-01T18:28:57+5:30

टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आदिती गुप्ताचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती स्वतः तिने चाहत्यांना दिली आहे.
टेलीचक्करशी बोलताना अदिती गुप्ताने सांगितले की, जेव्हा मला समजले की कोरोना झाला आहे तेव्हा सर्वात पहिले मी स्वतःला क्वारंटाइन केले.
अदिती पुढे म्हणाली की, कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले पण कोणतेही लक्षण नाहीत. मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे, 7-8 दिवस झाले मी एकाच खोलीत कैद आहे.
अदिती म्हणाली की, माझे मित्र, पती आणि कुटुंबातील मदत करत आहेत. आता थोडे बरे वाटत आहे. डाएटकडे लक्ष देते आहे आणि औषधेही घेते आहे. पुढील 10 दिवसांपर्यंत क्वारंटाइन राहणार आहे.
चाहत्यांना मेसेज देत सांगितले की कोरोना झाला असेल तर घाबरू नका. औषधे खा आणि पॉझिटिव्हिटीसोबत सामना करा.
सुरूवातीला मी खूप तणावाखाली होते. पण त्यात मी स्वतः कमकुवत झाली होती. काही दिवसात बरी होईन आणि तुमच्यासमोर येईन.
अदितीच्या आधी काही कलाकारांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पण ते बरे होऊन घरीदेखील परतले आहेत.
बॉलिवूड जगतात सर्वात आधी कोरोनाची लागण गायिका कनिका कपूरला झाली होती.