'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद
By देवेंद्र जाधव | Updated: February 23, 2025 15:36 IST2025-02-23T15:06:04+5:302025-02-23T15:36:42+5:30
आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सर्वांना खास माहिती दिली आहे

'आई कुठे काय करते' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी प्रभूलकर. मधुराणीला आपण 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीच्या भूमिकेत पाहिलंय.
'आई कुठे काय करते' मालिकेतून मधुराणीला खूप लोकप्रियता मिळाली. अरुंधतीने आज मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं
मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मधुराणीने तिला कोणती भूमिका साकारायला आवडेल या प्रश्नाचं उत्तर देताना खास खुलासा केला.
मधुराणीला बॅरिस्टर नाटकातील भूमिकेला खूप छटा असणारी भूमिका साकारायची इच्छा आहे. याशिवाय मधुराणीने आगामी सिनेमाविषयीही खास खुलासा केला.
"महाराष्ट्रातील एक तपस्वी दर्जाच्या असणाऱ्या शास्त्रीय गायिकेवर चित्रपट बनतोय. त्यात मी काम करतेय", असा खास खुलासा मधुराणीने केलाय.
अशाप्रकारे मधुराणी आगामी म्युझिकल बायोपीकमध्ये काम करणार आहे. मधुराणीने या सिनेमाविषयी सविस्तर माहिती सांगितली नाही.
मधुराणी स्वतः गायनकलेमध्ये सक्रीय असल्याने दिग्गज शास्त्रिय गायिकेची भूमिका मधुराणी उत्तम साकारेल यात शंका नाही. तिच्या चाहत्यांना आता या सिनेमाची उत्सुकता आहे.