लग्नाच्या दोन वर्षांनंतर 'गोपी बहू' देणार गुड न्यूज, फोटोत दिसला बेबी बंप, नेटकरी म्हणाले - प्रेग्नेंट आहेस का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:27 AM2024-06-28T09:27:55+5:302024-06-28T09:32:52+5:30

Devoleena Bhattacharjee: छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. हे फोटो पाहून ती प्रेग्नेंट असल्याचं बोललं जातंय.

छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. हे फोटो पाहून ती प्रेग्नेंट असल्याचं बोललं जातंय.

देवोलिना भट्टाचार्जी बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण यावेळी अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आहे.

खरेतर, टेलिव्हिजनवरील गोपी बहूने अलीकडेच समुद्रकिनाऱ्यावरील तिचे काही फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी आता तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

देवोलिना भट्टाचार्जी अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये देवोलिना समुद्रकिनारी कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसते आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.

देवोलिना भट्टाचार्जीने या फोटोंमध्ये पांढरा ड्रेस परिधान केला आहे. ज्यासोबत तिने जॅकेटही परिधान केले आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले, एक एक पाऊल पुढे टाकत प्रवासाला सुरूवात #AdventureAwaits'

देवोलीनाने मोकळे केस आणि मॅचिंग कानातले घालून तिचा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे. पण आता तिच्या लूकपेक्षाही अभिनेत्री तिच्या बेबी बंपमुळे चर्चेत आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप तिच्या टाइट फिट ड्रेसमध्ये दिसत आहे. हे पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेग्नेंट असल्याचा तर्क लावला आहे.

एकीकडे काही यूजर्स अभिनेत्रीला कमेंट करत 'तू प्रेग्नंट आहेस का..' असे विचारत असताना दुसरीकडे काही यूजर्सनी अभिनेत्रीचे अभिनंदन करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, 'दीदीचे खूप अभिनंदन'

देवोलीनाने डिसेंबर २०२२ मध्ये शाहनवाज शेखसोबत लग्न केले होते. या लग्नामुळे अनेक दिवसांपासून अभिनेत्री ट्रोल झाली होती.