PICS : अवनीत कौरचं ग्लॅमरस फोटोशूट, सौंदर्य कोणीही प्रेमात पडावं असंच..!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 17:27 IST2021-02-02T17:17:32+5:302021-02-02T17:27:32+5:30
अवनीतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘अल्लादिन- नाम तो सुना होगा’ या मालिकेतील यास्मिन आठवते ना. होय, अवनीत कौर तिचे नाव.
सध्या अवनीतचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
हे फोटो इतके सुंदर आहेत की, कोणीही अवनीतच्या प्रेमात पडावे.
या फोटोशूटमध्ये अवनीतने एकापेक्षा एक भारी पोज दिल्या आहेत.
तिच्या पोज पाहून अनेकांनी तिला स्लिपींग ब्युटी म्हटले आहे. चाहते या फोटोंवर अक्षरश: फिदा झाले आहेत.
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर म्हणायला फक्त 19 वर्षांची आहे. पण आत्तापासून मौनी रॉय व हिना खान सारख्या बड्या अभिनेत्रींना ती टक्कर देते.
अवनीत सध्या कोणत्याही शोचा भाग नाही. मात्र तरीही तिची चर्चा होते. तिची स्टाईल हीच तिची पर्सनॅलिटी बनली आहे.
फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अवनीत मौनी व हिनाला जबरदस्त टक्कर देते.
मौनीचे इन्स्टावर 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि हिना खानचे 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. अवनीतचे म्हणाल तर तिचे 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते.