IN PICS : जिंदगी आर रहा हूं मैं...! अभिनेता अनिरूद्ध दवे मृत्यूच्या दाढेतून परतला...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 16:43 IST2021-06-25T16:37:20+5:302021-06-25T16:43:00+5:30
Aniruddh Dave discharged from hospital : ‘पटियाला बेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवे अखेर 55 दिवसांनंतर कोरोनाला हरवून घरी परतला.

‘पटियाला बेब्स’ फेम अभिनेता अनिरूद्ध दवे अखेर 55 दिवसांनंतर कोरोनाला हरवून घरी परतला.
55 दिवसांपासून अनिरूद्ध भोपाळच्या एका रूग्णालयात भरती होता. आज त्याला रूग्णालयातून सुट्टी मिळाली.
आज आपल्याला रूग्णालयातून सुट्टी मिळणार, हे ऐकताच अनिरूद्ध भावुक झाला. रूग्णालयाच्या स्टाफसोबतचा फोटो शेअर करत त्याने भावुक पोस्ट शेअर केली.
फारच भावुक क्षण आहे. 55 दिवसांनंतर मला रूग्णालयात सुट्टी मिळतेय. सर्वांचे आभार. आॅक्सिजन नाही, आता स्वत: श्वास घेतोय. जिंदगी आ रहा हूं मैं...., अशी पोस्ट त्याने शेअर केली.
इन्स्टाग्रामवर डॉक्टरांचेही त्याने आभार मानलेत. आम्ही कलाकार फक्त पडद्यावर भूमिका साकारतो. पण खरे हिरो तुम्ही आहोत. माझ्यासारख्या अनेकांनी तुम्ही नवे आयुष्य दिले, असे त्याने लिहिले.
अनिरूद्ध दवे याला गेल्या 23 एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. अनिरूद्ध भोपाळमध्ये एका वेबसीरिजच्या शूटींगसाठी गेला होता. याचदरम्यान त्याची प्रकृती बिघडली होती आणि यानंतर आणखी बिघडत गेली.
आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाला होता. गंभीर अवस्थेत त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. तेव्हापासून तो रूग्णालयात होता.
अनिरुद्ध टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने शक्ति अस्तित्व के एहसास की, पटियाला बेब्ससोबत बºयाच मालिकेत काम केले आहे. तो अक्षय कुमारचा चित्रपट बेलबॉटममध्येही दिसणार आहे.