'आप्पी आमची कलेक्ट'फेम अर्जुनची आत्या खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:18 PM2023-03-17T13:18:54+5:302023-03-17T13:23:50+5:30

Aarti shinde: मालिकेत घाबरट दाखवलेली आरती खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आहे.

छोट्या पडद्यावर सध्या लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे आप्पी आमची कलेक्टर.

या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे.

या मालिकेत अभिनेत्री शिवानी नाईक हिने अप्पीची म्हणजेच अपर्णा माने ही मुख्य भूमिका साकारली आहे.

या मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय होत असतानाच त्यातील स्मिता कदम ही भूमिका चर्चेत आली आहे.

या मालिकेत स्मिता कदम ही अर्जुनची आत्या असून तिच्या उच्चशिक्षणाला घरच्यांनी विरोध केला. ज्यामुळे तिच्यावर मानसिक परिणाम झाल्याचं दिसून येतं.

या मालिकेत स्मिता कदम ही भूमिका अभिनेत्री आरती शिंदे हिने साकारली आहे.

मालिकेत घाबरट दाखवलेली आरती खऱ्या आयुष्यात चांगलीच बोल्ड आहे.

आरती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे.

सध्या सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो व्हायरल होत आहेत.

आरतीने आप्पी आमची कलेक्टरपूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.