Arti Singh : डिप्रेशन आलं, अनेक महिने बेरोजगार, मिळालं नाही काम; गोविंदाच्या भाचीने मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 11:28 AM2024-07-24T11:28:59+5:302024-07-24T11:43:41+5:30

Arti Singh : आरतीने तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. तिला इंडस्ट्रीत फारसं काम मिळत नाही असं आरतीने म्हटलं आहे.

गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची बहीण आरती सिंहने एप्रिलमध्ये बिझनेसमन दीपक चौहानशी लग्न केलं आहे. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत खूप आनंदात आहे.

आरतीने तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अनेक चढउतार पाहिले आहेत. तिला इंडस्ट्रीत फारसं काम मिळत नाही असं आरतीने म्हटलं आहे.

अभिनेता आणि बिग बॉस 13 फेम पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये आरती सिंह म्हणाली की, "बिग बॉस 13 नंतर मला इतर स्पर्धकांना जेवढं काम मिळत होतं तेवढं काम मिळत नव्हतं."

"इतर लोक अनेक म्यूझिक व्हिडीओ करत होते. त्यांना शोही मिळत होते." पारसने आरतीला विचारले- बिग बॉसनंतर तिला मेंटल डिप्रेशनने ग्रासलं होतं का? त्यावर उत्तर देताना आरतीने हो असं म्हटलं आहे.

अभिनेत्री म्हणाली की, रिॲलिटी शो संपल्यानंतर काम शोधण्यासाठी धडपड करत होती, त्यामुळे तिच्या मेंटल हेल्थवर अत्यंत वाईट परिणाम झाला होता.

शोनंतर इतर स्पर्धकांना टीव्ही शो, चित्रपट, म्युझिक व्हिडीओज मिळत असताना, ती मात्र बरेच महिने काहीही काम न करता राहिली होती.

आरतीसाठी तो काळ खूपच आव्हानात्मक होता. पारसने असंही सांगितलं की, शोनंतर त्यालाही काम शोधण्यात खूप अडचण आली.

आरती सिंहने मायका, उतरन, ससुराल सिमर का सारखे शो केले आहेत.

आरती सिंह सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.