४ वर्षांत मोडलं पहिलं लग्न, मग वयाने लहान असलेल्या अभिनेत्याशी थाटला मराठमोळ्या अभिनेत्रीने दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 04:43 PM2023-05-16T16:43:14+5:302023-05-16T16:54:01+5:30

पहिलं लग्न मोडल्यानंतर अभिनेत्री दुसऱ्यांदा प्रेमात पडली आणि दुसरा संसार आपल्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्याशी थाटला.

अश्विनी काळसेकरला कोणत्याही परिचयाची गरज नाही. अश्विनीने मराठी चित्रपटांद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.अश्विनीला शांती या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली. (Photo Instagram)

तिला खऱ्या अर्थाने ओळख सीआयडी या मालिकेमुळे मिळाली. अश्विनीने या मालिकेनंतर कसम से या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या मालिकेसाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. (Photo Instagram)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी काळसेकरने दोन लग्न केले आहेत. तिचं पहिलं लग्न केवळ 4 वर्षे टिकू शकले. (Photo Instagram)

अश्विनी काळसेकर यांनी 1998 मध्ये अभिनेता नितीश पांडेसोबत लग्न केले. मात्र, लग्न चार वर्षांतच त्यांच्या दुरावा निर्माण झाला. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. (Photo Instagram)

घटस्फोटानंतर अश्विनी पुन्हा प्रेमात पडली ती तिच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता मुरली शर्माच्या. दोघांची भेट 'अपरान' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. (Photo Instagram)

चित्रपटाच्या सेटवर भेटलेले अश्विनी आणि मुरलीमध्ये चांगली मैत्री झाली आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. 2009 मध्ये दोघांनी लग्न केलं. (Photo Instagram)

मुरली शर्माने मकबूल, मार्केट, मैं हूँ ना, अपहरण, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo Instagram)

मुरलीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तो मीडियापासून दूर राहाणेच पंसत करतो. (Photo Instagram)

अश्विनी आपल्या दुसरा पती मुरली शर्मासोबत सुखाने संसार करतेय. अनेकवेळा ती दोघांचे रोमाँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Instagram)