Bigg Boss संपल्यावर अभिनेत्रीने केला आर्थिक अडचणींचा सामना; म्हणाली, "पैसे संपले, डिप्रेशन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:48 IST2024-12-30T16:39:56+5:302024-12-30T16:48:19+5:30

अभिनेत्रीच्या वडिलांचा अपघात झाला. उपचारासाठीही नव्हते पैसे.

'बिग बॉस' मध्ये दिसलेले अनेक कलाकारांचं नशीब उजळतं. तर काही कलाकार गायब होतात. त्यांना नंतर कोणीही विचारत नाही. कोणाला अनेक संधी मिळतात तर कोणी अपयशीच होतं.

अशीच एक अभिनेत्री जिला बिग बॉसनंतर आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. तिला कामच मिळत नव्हतं. तसंच बिग बॉसमधून मिळालेले पैसेही संपले.

ही अभिनेत्री म्हणजे पवित्रा पुनिया (Pavitra Punia). बिग बॉस १४ मध्ये पवित्रा दिसली होती. शोमध्ये असताना तिची आणि अभिनेता एजाज खानची लव्हस्टोरी सुरु झाली होती. काही वर्षांनी त्यांचं नातं तुटलं.

ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पवित्रा म्हणाली, "कोरोनानंतर मला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. बिग बॉसनंतर परिस्थिती खूपच कठीण झाली. लॉकडाऊनमुळे काम मिळणं बंद झालं. तो आयुष्यातला सर्वात वाईट काळ होता. बिग बॉसमधून कमावलेले पैसेही संपले."

"पैशांची गोष्ट नव्हती पण जबाबदारीची जाणीव होती. आई वडिलांकडूनही पेसे मागू शकत नव्हते. मी बिग बॉसमधून बाहेर आले आणि एक महिन्यानंतर माझ्या वडिलांचा अपघात झाला. त्यांच्या उपचारासाठीहीस माझ्याकडे पैसे नव्हते."

"ते दीड वर्ष खूप कठीण होतं. मला डिप्रेशनही आलं होतं. इतकंच नाही तर आत्महत्या करण्याचे विचारही आले. पण शेवटी आईवडिलांनीच मला सांभाळून घेतलं."