bigg boss 14 for rubina dilaiks entry bigg boss ask abhinav shukla to sacrifice hard earned immunity
In Pics: ‘बिग बॉस 14’मध्ये मोठा ट्विस्ट; पत्नी रूबीनासाठी अभिनव शुक्ला सोडणार का ‘इम्युनिटी’? By रूपाली मुधोळकर | Published: October 7, 2020 03:56 PM2020-10-07T15:56:32+5:302020-10-07T16:20:51+5:30Join usJoin usNext पत्नी की इम्युनिटी ? ‘बिग बॉस 14’चा स्पर्धक अभिनव शुक्ला पत्नी रूबीनासाठी ‘इम्युनिटी’ त्याग करणार का? असा प्रश्न सध्या चाहत्यांना पडला आहे. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा रंगली आहे. टीव्हीवरचा आत्तापर्यंतचा सर्वात वादग्रस्त ठरलेला ‘बिग बॉस 14’ हा शो सुरू झाला आहे. मात्र शो सुरु होऊन चार दिवस उलटूनही काही स्पर्धकांना बिग बॉसच्या घरातील गार्डन एरियातच राहावे लागतेय. यात रबीना दिलैक हिचे नाव आहे. तिचा पती अभिनव शुक्ला मात्र बिग बॉसच्या घरात राहतोय. आता मात्र अभिनवचा थोडा त्याग पत्नी रूबीनाला घरात एन्ट्री मिळवून देऊ शकणार आहे. बिग बॉस 14 च्या पहिल्याच भागामध्ये सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांना एक विशेष पॉवर देण्यात आला होता. कोण सिलेक्ट होणार आणि कोण रिजेक्ट होणार, याचा निर्णय त्यांना घ्यायचा होता. त्यावेळी त्यांनी रुबीना आणि अभिनव या जोडीमधील रुबीनाला रिजेक्ट केले. त्यामुळे बिग बॉसने आखलेल्या नियमांनुसार रुबीनाला गार्डन एरिआमध्ये राहावे लागत आहे. पण आता रूबीना घरात येणार की गार्डन एरियामध्येच राहणार, हे अभिनवच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. होय, काल बिग बॉसने सर्व स्पर्धकांना टास्क दिला होता. तो टास्क अभिनवने जिंकला. टास्क जिंकल्यामुळे अभिनवला एक आठवड्याची इम्यूनिटी मिळाली आहे. मात्र नॉमिनेशनसाठी मिळालेली इम्यूनिटी पॉवर देऊन अभिनव पत्नी रुबीनाला बिग बॉसच्या घरात जागा देऊ शकतो असे बिग बॉसने अभिनवला म्हटले आहे. अशात आता अभिनव काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आज रात्री अभिनव पत्नीसाठी त्याग करतो की आणखी काही निर्णय घेतो, हे पाहायला मिळणार आहे. पत्नी की इम्युनिटी याचा निर्णय घेणे, तसे अभिनवसाठी सोपे नाही. एक आठवड्यांची इम्युनिटी घेतली तर पत्नी नाराज होणार,तिला घराबाहेर राहावे लागणार आणि पत्नीसाठी इम्युनिटी सोडली तर नॉमिनेशनच्या दिव्यातून जावे लागणार, असा हा गुंता आहे. आता हा गुंता कसा सुटतो, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. रूबीना व अभिनव यांनी 21 जून 2018 साली लग्न केले होते. बोल्ड फोटोंमुळे हे कपल कायम चर्चेत असते. लग्नाआधी पाच वर्षे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. शक्ती-अस्तित्व के अहसास की या मालिकेने रूबीनाला एक वेगळी ओळख दिली.टॅग्स :बिग बॉस १४bigg boss 14