Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 19:00 IST2021-10-05T18:54:52+5:302021-10-05T19:00:47+5:30
bigg boss 15:यंदाच्या पर्वात काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्पर्धकांविषयी प्रत्येकाच्याच मनात कुतुहल आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिल्या जाणाऱ्या बिग बॉसचं १५ वं पर्व नुकतंच सुरु झालं आहे. यंदाच्या पर्वात काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्पर्धकांविषयी प्रत्येकाच्याच मनात कुतुहल आहे. यामध्येच या स्पर्धकांचं मानधन किती हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळेच या स्पर्धकांचं मानधन जाणून घेऊयात.
जय भानुशाली - बिग बॉस १५ चा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक म्हणून जयकडे पाहिलं जातं. जयला एका आठवड्यासाठी ११ लाख रुपये मिळतात. त्यामुळे साधारणपणे त्याच्या दिवसाची कमाई १ लाख ६५ हजार रुपये आहे.
निशांत भट्ट - बीबी ओटीटीचा पहिला रनरअप निशांत भट्टला एका आठवड्यासाठी २ ख रुपये मिळतात. त्यामुळे त्याची दिवसाची कमाई ३० हजार रुपये आहे.
शमिता शेट्टी - बिग बॉस ओटीटीची सेकंड रनरअप शमिता शेट्टी ओटीटीवर सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती. मात्र, सीजन १५ मध्ये तिला आठवड्याला फक्त ५ लाख मिळतात. त्यामुळे एक दिवसाला ती ७० हजार कमावते.
करण कुंद्रा - करण कुंद्राला एका आठवड्यासाठी ८ लाख रुपये मिळतात. त्यामुळे साधारणपणे त्याच्या दिवसाची कमाई १ लाख २० हजार रुपये आहे.
उमर रियाज - आसिम रियाजचा भाऊ उमर रियाज याला ३ लाख रुपये मिळत असून तो एका दिवसामध्ये ४० हजार कमावतो.
तेजस्वी प्रकाश - तेजस्वी प्रकाश हिची एका आठवड्यासाठी १० लाख रुपये मिळतात. त्यामुळे साधारणपणे त्याच्या दिवसाची कमाई १ लाख ५० हजार रुपये आहे.
मायशा अय्यर - मायशा अय्यरला एका आठवड्यासाठी २ लाख रुपये मिळतात. त्यामुळे साधारणपणे त्याच्या दिवसाची कमाई ३० हजार रुपये आहे.
विशाल कोटियन - अनेक विनोदी मालिकांमध्ये झळकलेला विशाल एका आठवड्यासाठी २ लाख रुपये घेतो.
अफसाना खान- पंजाबी गायिका अफसाना खान आठवड्याला १० लाख रुपये घेते. त्यामुळे तिचं एका दिवसाचं मानधन १ लाख ५० हजार आहे.
अकासा सिंह - अकासाला एका दिवसासाठी ७० हजार मिळतात. त्यामुळे आठवड्याभरात तिला ५ लाखांचं पॅकेज मिळतं.
डोनल बिष्ट - डोनलला एका आठवड्यासाठी ४ लाख दिले जातात. त्यामुळे तिच्या एका दिवसाची कमाई ६० हजार आहेय
इशान सहगल - इशानला २ लाख रुपये एका आठवड्यासाठी दिले जातात.
विधी पंड्या - विधी पांड्याची फी ४ लाख असून ती एका दिवसासाठी ५० हजार आकारते.
सिम्बा नागपाल - शक्तीफेम सिम्बा नागपाल याचं मानधन सर्वात कमी असून तो आठवड्याला केवळ १ लाख रुपये मानधन घेतो. त्यामुळे त्याच्या एका दिवसाची कमाई १५ हजार रुपये आहे.