"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 03:28 PM2024-10-26T15:28:20+5:302024-10-26T15:41:52+5:30

श्रुतिका आपल्या वडिलांनी केलेला त्याग आणि संघर्ष याची आठवण काढून भावूक होताना दिसली.

बिग बॉस १८ मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. पण या भांडणांमध्ये अभिनेत्री श्रुतिका अर्जुन तिच्या खास अंदाजात चाहत्यांना हसायला भाग पाडते.

आता शोमध्ये श्रुतिका आपल्या वडिलांनी केलेला त्याग आणि संघर्ष याची आठवण काढून भावूक होताना दिसली. ती खूप रडू रडली.

आपल्या आई-वडिलांची आठवण काढत श्रुतिका म्हणाली – "मी माझ्या वडिलांना आणि आईला खूप मिस करत आहे. मी त्यांच्यापासून कधीच लांब राहिली नाही."

"माझे पप्पा हे अर्जुन (श्रुतिकाचा नवरा) एवढे श्रीमंत नाहीत. पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली आणि माझ्या भावाने एकदाही विचारलं नाही की, त्याच्यासाठी काय आहे."

श्रुतिका पुढे म्हणाली की, "वडील अजूनही माझ्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडत आहेत."

अभिनेत्री म्हणाली की, तिला तिच्या वडिलांसाठी घर घ्यायचं आहे. तिच्या आईला फिरण्याची खूप आवड आहे. म्हणूनच तिला तिच्या आईला वर्ल्ड टूरवर घेऊन जायचं आहे.

श्रुतिका शोमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ती या सीझनमधील मोस्ट एन्टरटेनिंग कन्टेस्टेन्ट आहे. तिचा खेळ चाहत्यांना खूप आवडतो.

श्रुतिका अर्जुन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत.