'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 02:34 PM2024-10-11T14:34:47+5:302024-10-11T14:50:29+5:30

Bigg Boss 18 : बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचं नवं पर्व नुकतंच सुरू झालं आहे. यंदाच्या पर्वात वादग्रस्त विधानांनी चर्चेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी झाले आहेत.

सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहिल्या दिवसापासूनच सदावर्तेंनी घरात त्यांचा दबदबा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते कायमच चर्चेत असतात.

सदावर्ते वकील असण्याबरोबरच डॉक्टरही आहेत. त्यांनी पीएचडी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही कायम चर्चेत असते. जयश्री सदावर्ते यादेखील एक डॉक्टर आहेत. सदावर्ते कपलचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.

सदावर्ते यांची मुलगी जेन हिने अवघ्या १० वर्षांच्या वयात १७ लोकांचे प्राण वाचवले होते. २०१८ मध्ये क्रिस्टल प्लाजा येथे आग लागली होती.

त्यावेळी तिसरीत असणाऱ्या जेनने लोकांना सुखरुप बाहेर काढलं होतं. यासाठी तिला राष्ट्रीय वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

सदावर्ते यांचे वडीलही पोलीस विभागात कार्यरत होते. राजकारणातही त्यांचा सहभाग होता.

चुकीच्या वर्तणुकीमुळे सदावर्तेंचं लायसन्स स्टेट बार काऊन्सिलकडून दोन वर्षांसाठी रद्दही करण्यात आलं होतं. अनेकदा ते जेलमध्येही गेले आहेत.