पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:22 IST2025-01-28T16:05:21+5:302025-01-28T16:22:12+5:30

'या' अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात बरंच काही भोगलं

बिग बॉस ९ मध्ये दिसलेली अभिनेत्री मंदाना करीमी (Mandanna Karimi) आठवतीये? मूळ इराणची असलेल्या अभिनेत्रीने भारतात येऊन मनोरंजनविश्वात स्थान मिळवलं.

मात्र मंदानाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही सहन करावं लागलं. लग्न मोडण्यापासून ते अबॉर्शन पर्यंत तिने सगळं काही बघितलं आहे. मंदानाने लॉकअप या रिएलिटी शोमध्ये अबॉर्शनविषयी खुलासा केला होता.

२०१६ मंदानाने वयाच्या २७ व्या वर्षी गौरव गुप्तासोबत लव्हमॅरेज केलं होतं. नंतर त्यांचा घटस्फोट झाला. तिने सासू सासऱ्यांवरही अनेक आरोप लावले होते. तसंच त्यांच्या विरोधात केसही दाखल केली.

मंदाना म्हणाली होती की, "मला माझ्या सासू सासऱ्यांनी ७ महिने आधीच घरातून बाहेर काढलं. मी त्यांच्यासोबत नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांनी ऐकलं नाही. गौरवनेही माझ्यासोबत बोलणं थांबवलं."

लग्नानंतर तो मला बळजबरी धर्म बदलायला सांगत होता. तसंच मला फिल्मी करिअर सोडायला सांगत होता. याउलट त्याचेच विवाहबाह्य संबंध होते हे मला नंतर कळलं.

"नंतर माझं एका दिग्दर्शकासोबत अफेअर होतं. आमचा लग्नाचाही विचार होता. मी प्रेग्नंट झाले आणि त्यानंतर तो मागे फिरला. मी अपॉर्शन करावं असं त्याला वाटत होतं. त्याला मुलाची जबाबदारी घ्यायची नव्हती. म्हणून मला अबॉर्शन करावं लागलं."

"ज्याला आपल्या वडिलांबद्दल माहितच नसेल, वडिलांचं नावच नसेल अशा बाळाला मला जन्म द्यायचा नव्हता." असंही मंदाना म्हणाली.