'बिग बॉस मराठी ५'मध्ये सहभागी झालेले १६ स्पर्धक कोण? वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:35 PM2024-07-28T23:35:02+5:302024-07-28T23:59:50+5:30

'बिग बॉस मराठी ५'चे १६ स्पर्धक कोण आहेत जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (bigg boss marathi 5)

'बिग बॉस मराठी ५' ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची एन्ट्री झालीय. वर्षा यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत ९० चा काळ गाजवला आहे. याशिवाय अलीकडेच त्या मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम करत होत्या.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता निखिल दामलेची एन्ट्री झालीय. निखिलला आपण नुकतंच कलर्स मराठीवरील रमा राघव मालिकेत अभिनय करताना पाहिलंय

'बिग बॉस मराठी ५'मध्ये कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता प्रभू-वालावलकर सहभागी झालीय. अंकिता तिच्या व्हिडीओमुळे आणि वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहिलीय

'बिग बॉस मराठी ५'मध्ये कॉमेडीचा बादशाह पॅडी म्हणजेच पंढरीनाथ कांबळेची एन्ट्री झालीय. पॅडीने आजवर महाराष्ट्राची हास्यजत्रा, फू बाई फू असा लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये काम केलंय. याशिवाय मराठी नाटकांमध्येही पॅडीने विनोदी भूमिका साकारल्या आहेत

'बिग बॉस मराठी ५'मध्ये 'जीव माझा गुंंतला' मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी योगिता चव्हाणची एन्ट्री झालीय. योगिताने मार्च महिन्यात मालिकेतील प्रमुख अभिनेता सौरभ चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली

'बिग बॉस मराठी ५'मध्ये 'भाग्य दिले तू मला' मधील खलनायिका जान्हवी किल्लेकरची एन्ट्री झालीय. जान्हवीचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून तिने विविध म्यूझिक व्हिडीओमध्येही काम केलंय.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये इंडियन आयडॉलचा विजेता अभिजीत सावंतची एन्ट्री झालीय. अभिजीतने २० वर्षांपूर्वी इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोचं विजेतेपद पटकावलं. अभिजीतचं मोहब्बते लुटाऊंगा गाणं आजही लोकप्रिय आहे.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध असलेला घनःश्याम दरवडेची एन्ट्री झालीय. घनःश्याम नगरचा छोटा पुढारी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक राजकीय सभांंमध्ये आणि प्रचारसभेत घनःश्यामचा सहभाग असतो

'बिग बॉस मराठी ५'मध्ये इरिना रुडाकोव्हा या परदेसी गर्लची एन्ट्री झालीय. इरिना ही गेल्या अनेक वर्षांपासून भारतात राहत असून तिला मराठी भाषाही बऱ्यापैकी बोलता येते.

'बिग बॉस मराठी ५' बिग बॉस हिंदीमध्ये टॉप ३ मध्ये पोहोचलेली स्पर्धक निक्की तांबोळीची एन्ट्री झालीय. निक्कीने घरात आल्यावर तिच्या ग्लॅमरस अदांनी सर्वांना घायाळ केलंय.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये मन झालं बाजिंद मालिकेतील अभिनेता वैभव चव्हाणची एन्ट्री झालीय. वैभव चव्हाणची शरीरयष्टी हा बिग बॉस मराठी ५ मधील चर्चेचा विषय राहिला.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये स्प्लिस्टसविला फेम अरबाज पटेलची एन्ट्री झालीय. अरबाज पटेलची बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री झालीय

'बिग बॉस मराठी ५'मध्ये रॅपरची राणी आर्या जाधवची एन्ट्री झालीय. आर्या जाधवने बिग बॉस मराठी ५ च्या घरात एन्ट्री केल्या केल्या रितेश देशमुखवर खास रॅप सॉंग बनवलंय

'बिग बॉस मराठी ५'मध्ये मठाधिपती आणि लोकप्रिय किर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील सहभागी झाले आहेत. किर्तन सांगण्याच्या अनोख्या शैलीने पुरुषोत्तम दादा पाटील यांची चर्चा आहे.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये धनंजय पोवार या सोशल मीडिया स्टारची एन्ट्री झालीय. पत्नी आणि आईसोबत रील शूट करण्याने धनंंजय पोवार फेमस झाला. धनंजयचा स्वतःचा व्यवसायही आहे.

'बिग बॉस मराठी ५'मध्ये गुलीगत धोका या डायलॉगने फेमस असलेला सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणची एन्ट्री झालीय. सूरजचे रील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.