'बिग बॉस मराठी' गाजवणाऱ्या जान्हवीचं खरं नाव माहितीये का? अभिनेत्रीने स्वत:च केलेला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 05:38 PM2024-08-22T17:38:52+5:302024-08-22T17:53:11+5:30

Bigg Boss Marathi Season 5 : जान्हवी किल्लेकर म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्रीचं मात्र हे खरं नाव नाही. तिचं खरं नाव वेगळं असल्याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने केला होता.

'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्या दिवसापासूनच जान्हवी किल्लेकर चर्चेत आहे. पण, जान्हवी तिच्या खेळापेक्षा जास्त बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

आधी दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा अपमान जान्हवीने केला होता. त्यानंतर आता पॅडी कांबळेला त्याच्या अभिनयातील करिअरवरुन जान्हवीने हिणवलं.

या ना त्या कारणामुळे जान्हवी चर्चेत येत आहे. पण, बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी निक्कीची सावली असल्याचंही म्हटलं जात आहे.

'बिग बॉस मराठी'चं घर डोक्यावर घेणाऱ्या जान्हवीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. भाग्य दिले तू मला या मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली.

याशिवाय जान्हवीने 'जय जय स्वामी समर्थ', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', 'आई माझी काळूबाई', 'श्री गुरुदेव दत्त' यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.

जान्हवी किल्लेकर म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्रीचं मात्र हे खरं नाव नाही. तिचं खरं नाव वेगळं असल्याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.

जान्हवी किल्लेकर हे अभिनेत्रीचं लग्नानंतरच नाव आहे. किरण किल्लेकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने तिचं नाव बदलून जान्हवी किल्लेकर असं केलं होतं.

जान्हवीचं लग्नाअगोदरच नाव भावना गायकवाड असं आहे. लग्नानंतर नावात बदल केल्याचा खुलासा तिने केला होता.