हलक्यात घेऊ नका! Mr Universe, ६ वेळा मिस्टर इंडिया अन्..; 'बिग बॉस'च्या घरात आलेला संग्राम चौगुले आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 03:05 PM2024-09-09T15:05:39+5:302024-09-09T15:24:04+5:30

Sangram Chougule : 'बिग बॉस मराठी'च्या घरात येताच अरबाज निक्कीशी थेट पंगा घेणारा हा संग्राम नक्की आहे तरी कोण?

बिग बॉस मराठीच्या सीझनमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. बिग बॉसच्या घरात पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेने बिग बॉस मराठीच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

धष्टपुष्ट शरीरयष्टी असलेल्या संग्राम चौगुलेने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यानंतर सदस्य आश्चर्यचकित झाले. काहींच्या भुवयाही उंचावल्याचं पाहायला मिळालं.

घरात येताच संग्रामने राडा घालायला सुरुवात केली आहे. एन्ट्री घेताच त्याने अरबाजला धमकी दिली तर निक्की तांबोळीशी थेट पंगा घेतल्याचं पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात येताच अरबाज निक्कीशी थेट पंगा घेणारा हा संग्राम नक्की आहे तरी कोण?

संग्राम चौगुले हा एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर आहे. आजवर त्याने अनेक किताब त्याच्या नावावर केले आहेत.

२०१२ साली ८५ किलो वजनी गटात संग्रामने मिस्टर युनिव्हर्सचा किताब जिंकत देशाची मान उंचावली होती.

त्याने तब्बल सहा वेळा मिस्टर इंडियाचा किताब जिंकला आहे. एवढंच नव्हे तर ५ वेळा तो मिस्टर महाराष्ट्र राहिला आहे.

संग्राम चौगुलेने इलेक्ट्रिकल इंजिनीयरचं शिक्षण घेतलं आहे. त्याचं फॅन फॉलोविंगही तगडं असून इन्स्टाग्रामवर त्याचे १.६ मिलियन फॉलोवर्स आहेत.

संग्रामच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं पुन्हा बदलल्याचं पाहायला मिळणार आहे.