या अभिनेत्रीला ओळखलं का? बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व तुफान गाजवलंय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 02:11 PM2024-10-04T14:11:23+5:302024-10-04T14:18:49+5:30

या अभिनेत्रीला बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व तिच्या खेळाने आणि रोखठोक स्वभावाने चांगलंच गाजवलंय

या अभिनेत्रीला ओळखलं का? या मराठी अभिनेत्रीने बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व चांगलंच गाजवलंय

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे मीरा जगन्नाथ. मीरा बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी होती

मीराने बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाच्या फायनलपर्यंत मजल मारली होती. मीराने फायनल जिंकली नसली तरीही ती फायनलची प्रबळ दावेदार मानली जात होती

मीरा सोशल मीडियावर कधी साडी, तर कधी मॉडर्न ड्रेसमध्ये फोटोशूट करत असते. मीरा प्रत्येक आऊटफिटमध्ये तितकीच सुंदर दिसते

मीरा सध्या मराठी मनोरंजन विश्वात तितकी सक्रीय नाही. तरीही ती बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनबद्दल तिची टीकाटिप्पणी करताना दिसली

मीरा सध्या Reality Ranis Of The Jungle या शोमध्ये सहभागी आहे. डिस्कव्हरी प्लस चॅनलवर हा शो टेलिकास्ट होतोय

मीराने येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत केलेला अभिनय चांगलाच गाजला. मीराला पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीत अभिनय करताना पाहण्यास तिचे फॅन्स उत्सुक आहेत