Bigg Boss Marathi Season 5: ६ वर्षांपूर्वी झालेला अपघात, आर्या जाधव कशी बनली रॅपर?; आज गाजवतेय बिग बॉसचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 01:44 PM2024-08-26T13:44:17+5:302024-08-26T13:54:30+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants: आर्याचा फॅमिली फोटो पाहिलात का?

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये अमरावतीच्या पोरीने लक्ष वेधून घेतलंय. निक्कीला एकटी भिडणारी ही आहे मराठमोळी रॅपर आर्या जाधव (Aarya Jadhav). अगदी कमी वयातही तिने आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केलंय.

गेल्या आठवड्यात आर्याचा खेळ पाहून रितेशनेही तिचं कौतुक केलं. बी टीममधली ती स्ट्राँग सदस्य आहे असं तो म्हणाला. तसंच आर्या सर्वाधित मतं मिळवून सुरक्षितही झाली.

आर्या खऱ्या आयुष्यात एक प्रसिद्ध रॅपर आहे. 'आर्या क्यू के (Aarya QK)' असं तिचं स्टेज नाव आहे. अमरावती ते मुंबई असा तिचा प्रवास आहे. तिचं 'नऊवारी' हे रॅप प्रचंड गाजलं. याशिवाय 'सायको साँग','ले जा' ही गाणीही लोकप्रिय झाली.

विदर्भाच्या आर्याने MTV HUSTLE 2.0 सारख्या नॅशनल स्टेजपर्यंत मजल मारली. जिद्द, टॅलेंट आणि मेहतनीच्या जोरावर तिने तिथेही वेगळं स्थान मिळवलं.

आर्याने रॅपिंग कसं सुरु केलं यामागेही एक कहाणी आहे. लोकमत सखीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, " 2018 मध्ये माझा अपघात झाला. यामध्ये माझ्या दोन्ही पाय आणि पाठीच्या मणक्याला दुखापत झाली होती. आठवीत असल्यापासूनच मी लिखाण करायचे. मग अपघात झाल्यानंतर बेड रेस्ट असल्याने वेळच वेळ होता. करायला काहीच नव्हतं. तेव्हा मी पुन्हा लिहायला सुरु केलं.

तेव्हा बाबांनी मला सांगितलं होतं की तू स्वत:लाच प्रश्न विचार की असं का होतंय. त्यातून जे येतं ते लिही. क्यू असं विचारल्यावर क्यू की असं उत्तर येतं. हीच थेअरी वापरुन मी आर्या QK हे नाव ठेवलं.

आर्याच्या या प्रवासात तिला तिच्या आईवडिलांची साथ मिळाली. वडिलांनीच आर्याला या रॅप क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांना सुद्धा आर्याचं लिखाण आवडत होतं. लेकीने लिहिलेला 'निर्भया' हा त्यांचा आवडीचा रॅप आहे.

आज आर्या बिग बॉसमधून मराठी इंडस्ट्रीही गाजवत आहे. जिथे बोलायची गरज तिथे बोलणार म्हणत आर्या स्वत:साठी अगदी उत्तम खेळत आहे. हे पाहून तिच्या खेळाचं प्रेक्षकांकडूनही खूप कौतुक होत आहे.