bigg boss marathi season 5 contestant suraj chavan eduation know about her inspirational story
बिग बॉस गाजवणाऱ्या 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणचं शिक्षण किती माहितीये? By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 05:06 PM2024-08-12T17:06:02+5:302024-08-12T17:11:43+5:30Join usJoin usNext छोट्या पडद्यावरील लोकप्रिय तितकाच वादग्रस्त ठरणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. बहुचर्चित बिग बॉसच्या पाचव्या पर्वामध्ये कीर्तनकार ते सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर यांची वर्णी लागली. या नव्या पर्वात रिलस्टार 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणदेखील सहभागी झाला आहे. टिकटॉकपासून सुरू झालेला त्याचा प्रवास बिग बॉसपर्यंत आला आहे. बारामतीच्या या पठ्ठ्याचे इन्स्टाग्राम व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. पण, बिग बॉसचं घर गाजवणाऱ्या सूरजचं शिक्षण किती आहे तुम्हाला माहितीये का? मीडिया रिपोर्टनुसार, अगदी बालपणीच सूरज आई-वडिलांपासून पोरका झाला. त्यानंतर त्याचा सांभाळ बहिणींनी केला. आपल्या मेहनतीच्या जोरावर सूरजने हा पल्ला गाठला आहे. अत्यंत गरीबीत दिवस काढून सूरजने जेमतेम आठवीपर्यंतच शिक्षण घेतल्याचं सांगण्यात येतं. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने मोलमजुरी करत दिवस काढले. सूरजचा इथपर्यंतचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.टॅग्स :बिग बॉस मराठीटेलिव्हिजनBigg Boss MarathiTelevision