Bigg Boss मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणाऱ्या संग्राम चौघुलेच्या पत्नी अन् मुलांना पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:35 PM2024-09-10T12:35:24+5:302024-09-10T13:08:16+5:30

संग्राम चौगुले कोल्हापुरचा बॉडी बिल्डर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला सुरुवात होऊन ४० दिवस उलटली आहेत. तसंच सर्वांना ज्याची प्रतिक्षा होती ती वाईल्ड कार्ड एन्ट्रीही नुकतीच झाली आहे. कोल्हापूरचा बॉडीबिल्डर, मिस्टर वर्ल्ड संग्राम चौगुलेने (Sangram Chougule) घरात प्रवेश घेतला आहे.

संग्राम चौगुलेने घरात येताच निक्की आणि अरबाजशी पंगा घेतला. इतकंच काय तर त्याने निक्कीला स्वीमिंग पूलमध्येही ढकललं. त्यामुळे तिथेच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. अशा या बॉडीबिल्डर संग्रामच्या रिअल लाईफ कुटुंबाविषयी जाणून घेऊया.

संग्राम चौगुले हा ४४ वर्षांचा आहे. कोल्हापूरचा रांगडा गडी आहे. त्याच्या पत्नीचं नाव स्नेहल चौगुले (Snehal Chougule) आहे. दोघंही सोशल मीडियावर असून त्यांच्या चाहत्यांचं त्यांच्यावर भरपूर प्रेम आहे.

संग्राम आणि स्नेहलला मोठा मुलगा शौर्य आणि छोटी मुलगी श्रिया आहे. शौर्य हा यावर्षीच दहावी पास झाला आहे. तर श्रिया अजून शाळेत आहे. चौगुले कुटुंबीय सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यांचे फोटो नेहमी व्हायरल होत असतात.

संग्राम आपल्या पत्नी आणि मुलांनाही फिटनेसटचे धडे देत असतो. त्यांच्याकडून तो वर्कआऊट, वेट लिफ्टिंगही करुन घेतो. याचेही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर आहेत.

संग्राम आणि स्नेहल फिजीक जीम चालवतात. नवी मुंबईत त्यांच्या अनेक शाखा आहेत.

संग्रामने बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली असून बाहेरुन स्नेहल पतीला चिअर करत आहे. तीच संग्रामचं सोशल मीडिया सांभाळत आहे. आता संग्राम या शोमध्ये किती पुढे जातो हे पाहायला मजा येणार आहे.