Bigg Boss Marathi Winners of All season: 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील पाच विजेत्यांची यादी वाचा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 09:00 PM2024-10-06T21:00:38+5:302024-10-06T21:09:53+5:30

'बिग बॉस' मराठीचे पाचवे पर्व खूप लोकप्रिय झाले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता झाला. यानिमित्ताने बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वातील विजेते कोण तेही पाहा.

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा (Bigg Boss Marathi Season 5) आज ग्रँड फिनाले पार पडला. ७० दिवस चाललेल्या या शोमध्ये सर्वांनीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

बारामतीच्या छोट्या गावातील सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी नावावर करत इतिहास रचला. इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंत रनर अप ठरला. रितेश देशमुखने सूरजला ट्रॉफी देत त्याला या पर्वाचा विजेता घोषित केलं.

बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वाबद्दल सांगायचे तर चौथ्या पर्वात अभिनेता अक्षय केळकर विजेता झाला होता. अक्षयने घरात त्याच्या साध्या वागण्याने सर्वांचेच मन जिंकले होते.

तिसऱ्या पर्वात विशाल निकम 'बिग बॉस' चा विजेता झाला होता. या पर्वात तर विशालच्या प्रेमप्रकरणाचीच चर्चा जास्त रंगली होती.

बिग बॉस २ चा विजेता होता सर्वांचा लाडका शिव ठाकरे. त्याचा गेम असो, त्याचं साधं वागणं असो किंवा हवा तिथे राग दाखवणं असो हे सर्वच प्रेक्षकांना भावलं होतं. तसंच त्याचे आणि वीणा जगतापचे प्रेमप्रकरणही गाजले होते.

बिग बॉस मराठी हा शो पहिल्यांदा सुरु झाला तो २०१८ मध्ये. या पर्वाची विजेती ठरली होती मेघा धाडे. जिला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला होता. तिच्यामुळे पहिला सिझन चांगलाच गाजला होता.