५ मिनिटं अभिनेत्रीला जबरदस्तीने किस करत राहिला सुपरस्टार; रडत राहिली हिरोईन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 12:34 PM2024-10-15T12:34:29+5:302024-10-15T12:44:17+5:30

किसिंग सीननंतर अभिनेत्रीला खूप मोठा धक्का बसला आणि त्या खूप रडल्या होत्या.

अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम भूमिका केल्या आहेत. अनेक सुपरस्टार्ससोबतही काम केलं आहे. आपल्या अभिनयाने स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला आहे.

रेखा यांचे अनेक चित्रपट गाजले. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या संमतीशिवाय त्यांना किस करण्यात आलं.

रेखा 'दो शिकारी' या चित्रपटात होत्या. या चित्रपटादरम्यान त्या फक्त १५ वर्षांच्या होत्या. चित्रपटात एक सीन होता ज्यामध्ये अभिनेत्याला रेखा यांना किस करायचं होतं. मात्र रेखा यांना याबाबतची माहिती नव्हती.

रेखा : द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात रेखा यांनी बंगाली सुपरस्टार बिस्वजित चॅटर्जी यांनी जबरदस्तीने त्यांचं किस घेतल्याचं सांगितलं होतं. या घटनेनंतर रेखा यांना मोठा धक्काच बसला.

रेखा यांनी सांगितलं की, अभिनेता आणि दिग्दर्शकाने त्यांना किसबद्दल काही सांगितलं नव्हतं आणि हा किस ५ मिनिटं होता. शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने अभिनेत्याला थांबवलं देखील नाही.

त्यावेळी अभिनेत्याचं वय ३२ वर्ष होतं. किसिंग सीननंतर रेखा यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या खूप रडल्या होत्या.

रेखा आणि बिस्वजित चॅटर्जी यांचा किसिंग सीन खूप वादात सापडला होता. चित्रपटात देखील किसिंग सीनचा समावेश करण्यात आला होता.

याबाबत विश्वजित चॅटर्जी यांना विचारलं असता त्यांनी स्वतःची बाजू सावरत उत्तर दिलं. दिग्दर्शकाने जे करायला सांगितलं तेच केलं असं म्हणत उत्तर दिलं.

रेखा आपल्या फॅशन सेन्स आणि डान्ससाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. अलीकडेच रेखा यांनी IIFA मध्ये २२ मिनिटे डान्स परफॉर्मन्स दिला आहे.

रेखा या वयातही फारच सुंदर दिसतात. त्यांचे असंख्य चाहते आहेत.