घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 17:10 IST2025-03-19T16:58:32+5:302025-03-19T17:10:26+5:30

धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. तिच्या नव्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय.

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) विभक्त होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून होत आहेत.

युजवेंद्र आणि धनश्री यांनी ५ फेब्रुवारीला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याच्या बातम्या आल्या होत्या.

चहल आणि धनश्रीला तातडीने घटस्फोट दिला जावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रेतील कुटुंब न्यायालयाला दिल्याची माहिती समोर आली आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा २२ डिसेंबर २०२२ रोजी विवाह झाला होता. त्यांचा हा विवाह भारतीय पद्धतीने झाला होता.

पण, दोघांमध्ये काही काळात बिनसलं. आता अखेर ते वेगळे होत आहेत. घटस्फोटोच्या या चर्चांमध्ये धनश्रीनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

या नव्या फोटोत धनश्री किलर लूकमध्ये दिसतेय. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.

एकिकडे घटस्फोट होत असला तरी धनश्रीनं कामावरुन लक्ष हटललेलं नाही.

तिने पोस्ट केलेले हे फोटो तिच्या नवीन प्रोजेक्टमधील असल्याचं दिसतंय.