अनुपमाचे फॅन आहात? मग या 8 फॅक्ट्स तुम्हाला माहित असायलाच हव्यात!! By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 01:26 PM 2022-05-11T13:26:27+5:30 2022-05-11T14:27:48+5:30
अनुपमा मालिका प्रेक्षकांना खूप भावते आहे आणि ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेशी निगडीत काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनुपमा मालिका प्रेक्षकांना खूप भावते आहे आणि ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. अहमदाबादला (Ahmadabad) राहणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय गटात मोडणाऱ्या शहा या गुजराती परिवाराची ही कहानी आणि अभिनेत्री रूपाली गांगुली म्हणजे या मालिकेची अनुपमा. वनराज, काव्या आणि आता अनुज या पात्रांभोवती फिरणारे अनुपमाचे कथानक. रोज घरोघरी पाहिल्या जाणार्या या मालिकेशी निगडीत काही इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रुपाली गांगुली 'अनुपमा' (Anupamaa) मालिकेत मुख्य भूमिका साकारते आहे, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या भूमिकेसाठी ती पहिली पसंत नव्हती. त्याच्या आधी शोच्या डायरेक्टरने ही भूमिका जुही परमार, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी या अभिनेत्रींना ऑफर केली होती.
अनुपमा बंगाली मालिका 'श्रीमोई'चा रिमेक आहे. 'आई कुठे काय करते' हे या मालिकेचं हिंद व्हर्जन आहे.
स्टार प्लसच्या या सुपरहिट सीरिअलचे नाव आधी काही वेगळेच होते. दिग्दर्शकाने या मालिकेच्या नावाबाबत खूप डोकेफोड केली. यापूर्वी त्याला 'अनुपमा की कहानी', 'अन्नू की कहानी', 'रिश्तों की दास्तां'अशी नावे देण्याबाबत चर्चा होती.
रुपाली गांगुली या मालिकेसाठी निवड होण्यापूर्वी काहीकाळ ब्रेक घेतला होता. मुलाच्या संगोपनासाठी तिने ब्रेक घेतला. या मालिकेद्वारे तिने 7 वर्षांनी कमबॅक केलं.
या मालिकेत सुधांशू पांडे अनुपमाच्या पतीची भूमिका साकारत आहे. तो एक प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुधांशू मूळचा उत्तराखंडचा असून अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी त्याला सैन्यात भरती व्हायचे होते.
रुपाली गांगुली पुन्हा एकदा या मालिकेद्वारे भारतातील प्रत्येक घराघरात प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वी तिने 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत काम करून लोकांची मने जिंकली आहेत. इतकेच नाही तर ती प्रसिद्ध दिग्दर्शक अनिल गांगुली यांची मुलगी आहे.
मदालसा शर्मा चक्रवर्ती इस सीरियल में वनराज की दूसरी पत्नी का रोल प्ले कर रही हैं. वो एक फ़ेमस साउथ इंडियन एक्ट्रेस और वेटरन एक्टर मिथुन चक्रवर्ती के बेटे मिमोह की पत्नी हैं.
'अनुपमा' (Anupamaa) मध्ये मुस्कान पाखीची भूमिका साकारत आहे. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.