Abhijeet khandkekar : अभिजीत खांडेकरच घर पाहिलंत का? पाहा अभिनेत्याच्या स्वीट होमचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 19:06 IST2023-02-01T14:51:02+5:302023-02-01T19:06:49+5:30
Abhijeet khandkekar: कलाविश्वात सक्रीय असलेल्या अभिजीतने गेल्यावर्षी मुंबईत नवीन घर घेतलं आहे. पाहा त्याच्या घराची एक झलक.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या माध्यमातून अभिजीत घराघरात पोहोचला. (फोटो इन्स्टाग्राम)
सध्या अभिजीत तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. आज अभिनेत्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही तुम्हाला त्याच्या घराची एक झलक दाखवणार आहोत.(फोटो इन्स्टाग्राम)
कलाविश्वात सक्रीय असलेल्या अभिजीतने गेल्यावर्षी मुंबईत नवीन घर घेतलं आहे. त्यावेळी गृहप्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने या अभिजीत आणि सुखदाने नव्या घरात गृहप्रवेश केला होता. यावेळी कलाविश्वातील काही मोजकी मंडळी व घरचे उपस्थित होते. (फोटो इन्स्टाग्राम)
सुखदा अभिजीतप्रमाणेच लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक गाजलेल्या ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केलं आहे.(फोटो इन्स्टाग्राम)
सुखदा आणि अभिजीत अनेकवेळा त्याचं रोमाँटिक फोटोशूट घरात करत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)
मराठी कलाविश्वात अनेक कलाकार मंडळी अभिजीत आणि सुखदाच्या घरी हजेरी लावत असतात. (फोटो इन्स्टाग्राम)
(फोटो इन्स्टाग्राम)