'उंच माझा झोका'ची चिमुकली रमा आठवतीये का? आता दिसते कमालीची ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 12:41 PM2023-03-24T12:41:01+5:302023-03-24T12:47:12+5:30

Tejashree walavalkar: तेजश्री उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच तिला लिखाणाचीही आवड आहे. तिने दोन बालनाट्यही लिहिल्याचं सांगण्यात येतं.

२०११ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'उंच माझा झोका' ही मालिका तुफान लोकप्रिय झाली.

या मालिकेच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला.

या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर हे दिग्गज कलाकार झळकले होते. मात्र, यांच्यासोबतच प्रेक्षकांचं मन त्यातील बालकलाकाराने वेधून घेतलं.

बालकलाकार तेजश्री वालावलकर हिने या मालिकेत रमाबाईंच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

या मालिकेमुळे तेजश्री विशेष लोकप्रिय झाली. मात्र, आता ही चिमुकली काय करते?, कशी दिसते? असे प्रश्न अनेकांना पडतात.

तेजश्री आता मोठी झाली असून तिचा लूक चांगलाच बदलला आहे. ती दिवसेंदिवस ग्लॅमरस होताना दिसते.

तेजश्री उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच तिला लिखाणाचीही आवड आहे. तिने दोन बालनाट्यही लिहिल्याचं सांगण्यात येतं.

‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ या नाटकांचं दिग्दर्शन तिने केलं असून यात कामही केलं आहे.

2010 मध्ये मी ‘आजी आणि नात’ या चित्रपटातही ती झळकली होती.