'चंद्रकांता'मध्ये 'यक्कू' बोलणारा क्रूर सिंग आठवतोय का?, आता दिसतो असा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 07:19 PM2023-04-12T19:19:58+5:302023-04-12T19:22:53+5:30

'चंद्रकांता' या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाल्या, मात्र क्रूर सिंगचे पात्र आजही लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. विचित्र केस आणि चेहऱ्याचा अविस्मरणीय लुक यामुळे क्रूर सिंगच्या भूमिकेत जीव रंगला होता. ही मालिका २९ वर्षांपूर्वी आली होती.

८० ते ९० च्या दशकात दूरदर्शनवर अशा मालिका आल्या ज्यांची लोकप्रियता मोडणे फार कठीण आहे. त्या काळात या मालिकांची क्रेझ आणि पात्रांची लोकप्रियता इतकी वाढली होती की लोक कलाकारांना त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर टीव्ही सीरियलच्या नावाने ओळखू लागले होते. अशीच एक टीव्ही मालिका म्हणजे 'चंद्रकांता'.

या मालिकेतील अनेक व्यक्तिरेखा प्रसिद्ध झाल्या, मात्र क्रूर सिंगचे पात्र आजही लोकांच्या ओठावर आहे. विचित्र केस आणि चेहऱ्याचा अविस्मरणीय लुक यामुळे क्रूर सिंगच्या भूमिकेत जीव रंगला होता. ही मालिका २९ वर्षांपूर्वी आली होती. पण तुम्हाला माहित आहे का की क्रुर सिंगची भूमिका साकारणारा कलाकार कोण आहे आणि कुठे आहे.

'चंद्रकांता' या मालिकेतील क्रूर सिंगचे पात्रही प्रसिद्ध झाले होते कारण तो अशी टॅगलाईन बोलायचा, ज्यामुळे लोक हसायचे. ही टॅगलाइन आहे- 'यक्कू.' हे पात्र अखिलेंद्र मिश्राने टीव्हीवर साकारले होते.

अखिलेंद्र मिश्रा यांना अभियंता व्हायचे होते. पदवीही घेतली, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही. यानंतर अखिलेंद्र अभिनयाकडे वळले आणि थिएटरमध्ये सामील झाले.

यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. मात्र, १९९४ मध्ये आलेल्या 'चंद्रकांता' या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली.

या मालिकेनंतर त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. त्यांंना टीव्ही इंडस्ट्री आणि चित्रपटांमध्ये काम करून जवळपास ३० वर्षे झाली आहेत. मात्र, कालांतराने त्याच्या लूकमध्येही बरेच बदल झाले आहेत. ते आता सोशल मीडियावर जास्त सक्रिय असतात.