Tejaswi Prakash: नागिन ६ च्या सेटवर दिसला तेजस्वी प्रकाशचा एथनिक लूक, ट्रेडिशनल रूप केलं फ्लॉन्ट By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 10:10 AM 2022-02-02T10:10:12+5:30 2022-02-02T10:17:27+5:30
Tejaswi Prakash: बिग बॉस १५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे. नुकतीच ती Naagin-6 च्या सेटवर दिसून आली. यावेळी ती एथनिक आऊटफिटमध्ये दिसती. या वेशात ती खूप सिंपल आणि सुंदर दिसत होती. बिग बॉस १५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे. नुकतीच ती नागिन ६ च्या सेटवर दिसून आली. यावेळी ती एथनिक आऊटफिटमध्ये दिसती. या वेशात ती खूप सिंपल आणि सुंदर दिसत होती.
तेजस्वी प्रकाश ही नागिन ६ मालिकेमध्ये इच्छाछारी नागिनीची भूमिका बजावणार आहे. बिग बॉस १५ संपल्यानंतर तेजस्वीने लगेच नागिन ६ च्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. ती नुकतीच शोच्या सेटवर स्पॉट झाली होती. तिचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
तेजस्वी प्रकाश मंगळवारी संध्याकाळी पवईमध्ये नागिन ६ च्या शोच्या सेटवर स्पॉट झाली. यावेळी ती एथनिक ड्रेसमध्ये दिसून आली. तिने सलवार आणि पायजमा परिधान केला होता. तसेच त्यावर मॅचिंग ओढणीही घेतली होती.
तेजस्वीने केस बांधले होते. तसेच या रूपात ती खूप सुंदर दिसत होती. यामध्ये ती खूप सिंपल लूकमध्ये दिसत होती.
तेजस्वी प्रकाशने तिच्या हातात मोबाईल घेतला होता. ती फोटोग्राफरना पोझ देताना मोबाईल पाहण्यात व्यस्त होती.
तेजस्वी प्रकाशला या कार्यक्रमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करण्यापूर्वी पालक आणि बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत वेळ घालवण्यासाठी केवळ एक दिवसाचा वेळ मिळाला होता.
नागिन ६ च्या निर्मात्यांनी एक दिवसापूर्वी तेजस्वी प्रकाशकडे ट्रायलसाठी कपडे पाठवले. तसेच तेजस्वीने ट्रायसुद्धा केले.
शो च्या प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, नागिन ६ मध्ये तेजस्वी प्रकाश सोबत बिग बॉस १५ मधील सहकलाकार असलेला सिंबा नागपाल हासुद्धा असणार आहे.
नागिन ६ आतापर्यंतचा सर्वात महागडा सिझन असणार आहे. निर्माती एकता कपूर ही नागिन ६ ही मालिका १३० कोटी रुपयांचे भरभक्कम बजेट खर्चून तयार करत आहे.