'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत असा पार पडणार ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 04:00 PM2024-07-22T16:00:28+5:302024-07-22T16:17:04+5:30

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत पार पडणार ऋषिकेश-जान्हवीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडणार आहे (gharoghari matichya chuli)

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे.

जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मिळून पुन्हा एकदा दोघांच्याही लग्नाचा घाट घातलाय.

जानकी-ऋषिकेशने संगीत सोहळ्यासाठी फिक्का जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.

गीत सोहळ्यात जानकी-ऋषिकेशच्या प्रेमाचा प्रवास उलगडणार आहे

या संगीतसोहळ्याला वैशाली सामंतसोबत छोट्या उस्तादांनी देखील खास हजेरी लावली आहे.

साधी माणसं मालिकेतील सत्या मीरा या दोघांनी ऋषिकेश-जानकीच्या संगीतसोहळ्याला हजेरी लावली

जानकी-ऋषिकेशच्या संगीत सोहळ्याचा हा खास एपिसोड घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सायंकाळी ७.३० वाजता बघायला मिळेल