ही शान फेट्याची...! नऊवारी साडी अन् पारंपरिक दागिने; गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा साजशृंगार, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:28 IST2025-03-29T13:17:40+5:302025-03-29T13:28:47+5:30

गुढीपाडव्यानिमित्त रुपाली भोसलेचा मराठमोळा साज, शेअर केला सुंदर व्हिडीओ, चाहत्यांची नजर हटेना.

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहणारी आहे.

या मालिकेत खलनायिका संजनाची व्यक्तिरेखा साकारुन अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली.

'आई कुठे काय करते' मालिकेत तिने केलेल्या कामाचं आजही सर्वत्र कौतुक होताना दिसतं.

सध्या रुपाली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

उद्या रविवारी, ३० मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नऊवारी साडी, डोक्यावर फेटा आणि डोळ्यांवर गॉगल लावून अभिनेत्री रॉयल एनफिल्ड चालवताना दिसते आहे.

"फक्त मुलांचीच नाहीतर रॉयल एनफिल्ड अनेक मुलींची आवडीची... असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.

रुपाली भोसलेचा स्वॅग पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.