छोट्या पडद्यावर गुढी पाडव्याचा जल्लोष, गुढी उभारून करणार नवं वर्षाचं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:53 AM2024-04-08T11:53:58+5:302024-04-08T12:18:58+5:30

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी छोट्या पडद्यावरील परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, शिवा, तुला शिकवीन चांगला धडा, सुख म्हणजे नक्की काय असतं, पारू, 'सारं काही तिच्यासाठी', अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

मराठी नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्यासाठी छोट्या पडद्यावरील परिवार सज्ज आहे. ठरलं तर मग, शिवा, तुला शिकवीन चांगला धडा, सुख म्हणजे नक्की काय असतं, पारू, 'सारं काही तिच्यासाठी', अबोली, घरोघरी मातीच्या चुली, लक्ष्मीच्या पाऊलांनी आणि प्रेमाची गोष्ट मालिकेत पारंपरिक पद्धतीने गुढीपाडवा साजरा होणार आहे.

घरोघरी मातीच्या चुलीमध्ये १५ वर्षांनंतर रणदिवे आणि विखे-पाटील कुटुंब एकत्र गुढी उभारणार आहेत. सौमित्र आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर सयाजीरावांनी एकत्र गुढी उभारण्यास सहमती दिली आहे. पाडव्याच्या गोडव्याप्रमाणे दोन्ही कुटुंबांमधला नात्याचा गोडवाही वाढेल का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी शालिनी आणि नित्या पहिल्यांदा एकमेकींसमोर येणार आहेत. शालिनीच्या पापांचा घडा आता भरलाय. त्यामुळे हा गुढीपाडवा शालिनीसाठी नवा धमाका घेऊन येणार आहे.

ठरलं तर मग आणि अबोली मालिकेतही कलाकारांनी जल्लोषात गुढी उभारली आहे. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे गुढीपाडवा विशेष भाग.

एका लहान मुलाला वाचवताना शिवाच्या हाताला लागत, हाताला लागल्यामुळे रामभाऊ तिला घरी यायला सांगतात. शिवाला घरी पाहून आशु शॉक होतो. तर दुसरीकडे आशु गुढी उभारत असताना त्याच्या हातून गुढी सुटते आणि नेमकी त्याचवेळेस शिवा ती सांभाळते. त्यामुळे योगायोगाने आशु आणि शिवाच्या हातून गुढी उभारली जाणार. ही नव्या नात्याची सुरुवात तर नसेल.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये अक्षरा फुलपगारे बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार करते. त्या आधीच भुवनेश्वरी अक्षराची ही तक्रार खोटी ठरवत फुलपगारे सरांना समोर उभं करत तिचा आरोप खोटा ठरवते. त्यामुळे अक्षराला भुवनेश्वरीची माफी मागावी लागते . फॅक्टरी मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कामगार आग्रह करतात की गुढी अक्षराच्या हातून उभारली जावी. हे कळल्यावर भुवनेश्वरीला राग येतो. ह्या वर्षी अक्षरा गुढी उभारून कामगारांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे.

'पारू' ह्या मालिकेत नेमकं पारू बाहेर गेली असताना क्लायंट ब्रँड अम्बॅसॅडर बरोबरच्या फोटोजची फोटोसची मागणी होते. अखेर पारूला शोधून आणला जातं. पारू घाबरलेल्या अवस्थेत फोटो शूटसाठी तयार होते. नेमका हा दिवस आहे पाडव्याचा. पारूचं अहिल्यादेवीच्या वेशात फोटोशूट होतं आणि त्याचवेळी तिच्या हातून गुढीची पूजा पण पार पडते.

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली व सुजय पियु गुढी उभारतात.

'सारं काही तिच्यासाठी' मध्ये निशी- नीरजचा साखरपुडा शुभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे.