चालतंय की, रांगडा राणा दाचा स्टायलिश लूक ठरतोय चर्चेचा विषय,पाहाल तर पाहतच राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:35 PM2021-08-16T19:35:42+5:302021-08-16T19:42:48+5:30

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीने आपल्या अभिनयासोबतच हटके लूकनेही रसिकांची पसंती मिळवली होती. त्यामुळे तरुणी फुल ऑन त्याच्यावर फिदा असायच्या.

अभिनेता हार्दीक जोशी याच्या राणादा या व्यक्तिरेखेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि राणामुळे हार्दिकला ओळख मिळाली.

हार्दिक एका नवीन भूमिकेसोबत पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय.

कलाकार खऱ्या अर्थाने भूमिका जगण्यासाठी विशेष कष्ट आणि मेहनत घेतात.

अभिनेता हार्दीक जोशी त्याच कलाकारांपैकी एक आहे.

“तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं” या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झालाय.

मालिकेतल्या प्रोमोमधला हार्दिका अंदाजही चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.

हार्दीकचा स्टायलिश लूक पाहून चाहतेही त्याच्या लूकचे प्रचंड कौतुक करत आहेत.

हार्दीकचा नवीन लूक आघाडीच्या अभिनेत्यांनाही देतोय टक्कर.

आगामी काळात मराठीतील एक हँडसम अभिनेता म्हणून हार्दिकची ओळख निर्माण होणार असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

चाहते हार्दिक जोशीच्या ऑनस्क्रीन लूक प्रमाणे ऑफस्क्रीन लूकवरही फिदा होताना दिसत आहेत.