पूजा बॅनर्जीच्या बेबी शॉवरचे फोटो तुम्ही पाहिलेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 14:43 IST2020-09-15T14:34:57+5:302020-09-15T14:43:09+5:30
पाहा फोटो...

‘तुझ संग प्रीत लगाई सजना’मधील वृंदाच्या भूमिकेमुळे चर्चेत आलेली टीवी अभिनेत्री पूजा बनर्जी लवकरच आई होणार आहे.
पूजाने तिच्या बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मी ही भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. मला सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. पहिलं सरप्राइज देण्यासाठी कुणाल वर्मालाही धन्यवाद,असे हे फोटो शेअर करताना पूजाने लिहिले आहे.
पूजा व कुणाल धुमधडाक्यात लग्न करणार होते. परंतु कोरोनामुळे त्यांनी हा प्लान रद्द करत कोर्ट मॅरेज केले.
पूजा व कुणालच्या लग्नाचा सोहळा 15 एप्रिल रोजी होणार होता. मात्र कोरोनामुळे धुमधडाक्यात लग्नाचा प्लान पुढे ढकलण्यात आला.
पूजाने टीव्हीवरील तुझे संग प्रीत बड़ा बड़ा सजना, द कपिल शर्मा शो आणि देवों के देव महादेव अशा अनेक प्रसिद्ध कार्यक्रम केले आहे.
या मालिकेव्यतिरिक्त सर्वगुण संपन्न, कबूल है, कॉमेडी नाइट्स बचाओ, झलक दिखला जा 8, कॉमेडी क्लासेस या शोजमध्येही तिने काम केले आहे.
पार्वतीच्या भूमिकेमुळे पूजा खूप प्रसिद्ध झाली आहे.
पूजा आणि कुणाल यांची पहिली भेट तुझ संग प्रीत लगाई सजना या मालिकेच्या सेटवर झाली होती. हळूहळू यांच्यात जवळीक निर्माण झाली.