Hina Khan : रंगामुळे मिळालं रिजेक्शन; हातातून गेला मोठा प्रोजेक्ट, अभिनेत्रीने सांगितली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 12:22 IST2025-02-20T12:12:27+5:302025-02-20T12:22:50+5:30
Hina Khan : मुलाखतीत हिनाने सांगितलं की, तिलाही इंडस्ट्रीमध्ये रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करणारी हिना खान आता तिच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहे. काही काळानंतर ती छोट्या पडद्यावर परतली आहे.
हिना लवकरच कॅन्सरमुक्त होईल अशी आशा करत आहे. अलिकडेच एका मुलाखतीत हिनाने सांगितलं की, तिलाही इंडस्ट्रीमध्ये रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे.
हिना म्हणाली- मला एक मोठा प्रोजेक्ट ऑफर करण्यात आला होता, पण माझ्या त्वचेच्या रंगामुळे मला नाकारण्यात आलं.
"मी एक काश्मिरी मुलगी आहे आणि माझ्या त्वचेचा रंग गव्हाळ आहे. त्यांना गोऱ्या रंगाच्या काश्मिरी मुलीला साईन करायचं होतं"
"मी तुम्हाला प्रोजेक्ट काय होता याबद्दल जास्त काही सांगणार नाही, पण मला नाकारण्यात आलं कारण मी काश्मिरी दिसत नाही. माझा त्वचेचा रंग तसा नाही."
"जेव्हा मला माझ्या त्वचेच्या रंगामुळे नाकारण्यात आलं तेव्हा मला वाईट वाटलं, पण मी आशा सोडली नाही."
"मी भविष्यातही प्रयत्न करत राहीन. जर ही भूमिका नाही तर दुसऱ्या भूमिकेत काम करेन" असं हिना खानने म्हटलं आहे.
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिच्या प्रकृतीचे अपडेट देत असते.
हिना खानचे असंख्य चाहते आहेत. हिना कॅन्सरमधून लवकर बरी व्हावी यासाठी ते सतत प्रार्थना करत आहेत.