हिना खानने या अंदाजात चाहत्यांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा, शेअर केले पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:20 IST2021-04-14T13:20:25+5:302021-04-14T13:20:25+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत हिना खान पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
हिना खानने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर करत चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, रमजान मुबारक
टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री हिना खान ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून अभिनयाच्या कारकीर्दीला सुरूवात केली होती.
हिना खानने हॅक्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
२०१७ साली हिना खान फिअर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनरअप ठरली होती. त्यानंतर २०१८ साली कसौटी जिंदगी की मालिकेत कोमोलिकेच्या भूमिकेत दिसली होती.
हिना खानचे इंस्टाग्रामवर १२.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.