"तू खरंच देवाचा आशीर्वाद...", हिना खानने पोस्ट शेअर करत बॉयफ्रेंडचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:42 IST2025-01-26T12:07:42+5:302025-01-26T12:42:59+5:30

रॉकी बनलाय हिनाचा खंबीर आधार, कॅन्सरच्या लढाईत देतोय साथ

अभिनेत्री हिना खान (Hina Khan) सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंद देत आहे. या कठीण प्रसंगात ती जमेल तितकं सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. तसंच तिला यामध्ये कुटुंब, मित्रपरिवाराची साथ मिळत आहे.

हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल तिच्यामागे खंबीरपणे उभा आहे. तो सावलीसारखा तिच्यासोबत चालत आहे. हिनाने नुकतीच पोस्ट शेअर करत रॉकीचे आभार मानलेत. तसंच त्यांचे काही फोटोही तिने शेअर केलेत.

हिना हॉस्पिटलमध्ये असताना रॉकी पूर्ण वेळ तिची काळजी घेत आहे. तिला जेवण भरवत आहे. तिची सेवा करताना दिसत आहे.

आणखी एका फोटोत हिना खुर्चीवर अस्वस्थ बसली आहे. तर रॉकी तिचे पाय चेपताना दिसत आहे. जमेल तितका तिला आराम देण्याचा प्रयत्न करत आहे.

कॅन्सरच्या प्रवासात हिनाचे केसही गेले. हिनाला याचं फार दु:ख होऊ नये म्हणून रॉकीनेही तिच्यासोबत डोक्यावरचे सगळे केस काढले होते.

हिना लिहिते, "ज्या दिवशीपासून किमाथेरपी सुरु झाली तेव्हापासून रॉकी माझ्यासोबत गाईडसारखा उभा आहे. शरीर स्वच्छ करण्यापासून ते कपडे घालण्यापर्यंत सगळं तो करतो. तो माझ्याभोवती घेर करु उभा राहिला आहे."

"आपण हसलो, रडलो, पडलो मी अनेकदा तुला दु:ख दिलं. पण तितकंच आपण एकमेकांचे अश्रुही पुसले. डॉक्टर तर नेहमीच बोलतात पण आज मीही बोलते की तू खरंच देवाचा आशीर्वाद आहेस."

हिना आणि रॉकी मालदीव व्हॅकेशनवरही गेले होते. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्येही रॉकी हिनाला जमेल तितकं खास ट्रीट करत आहे जेणेकरुन ती मानसिकरित्या स्ट्राँग राहील. त्यांचे हे फोटोच त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहेत.