काळा स्विमसूट अन् डोळ्यांना गॉगल; 'उतरन' फेम अभिनेत्रीचे मालदीव व्हेकेशन फोटो चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 16:33 IST2024-07-24T16:24:53+5:302024-07-24T16:33:30+5:30
टीना दत्ता ही हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली. सध्या टीना दत्ता मालदीव येथे व्हेकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.
छोट्या पडद्यावरील 'उतरन' या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरात पोहचली. शिवाय 'बिग बॉस १६' या शोमुळे ती प्रचंड चर्चेत होती.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये टीना दत्ताने आपली फिगर फ्लॉन्ट केल्याचं पाहायला मिळतंय.
फोटोंमध्ये स्विमसूटवर तिने पिवळ्या रंगाची हॅट घातली आहे. तसेच डोळ्यांना काळ्या रंगाचा चष्मा देखील लावला आहे.
काळा रंगाच्या वन शोल्डर स्विमसूटमध्ये अभिनेत्रीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे.
टीना दत्ताचे हे व्हायरल फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.